spot_img

Deepika Padukone : ‘भूतकाळातील काही चित्रपटांवर होतो पश्चात्ताप’ असं काय म्हणाली दीपिका?

spot_img

हार्पर बझारला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने प्रामाणिकतेला दिलेलं महत्त्व; दोन मोठे प्रोजेक्ट्सही चर्चेत

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) ‘ओम शांती ओम’ (Om Shnati Om) मधून चमकदार पदार्पण केल्यानंतर गेल्या 18 वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, या प्रवासात तिला अपयशाचाही सामना करावा लागला. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही, तर काहींवर समीक्षकांनी कठोर टीका केली. नुकत्याच दिलेल्या हार्पर बझार इंडियाच्या मुलाखतीत दीपिकाने याबाबत उघडपणे बोलत स्वतःच्या भूतकाळातील काही निर्णयांवर आजही खंत असल्याची कबुली दिली.

दीपिका म्हणाली, “माझ्यासाठी एकच गोष्ट अविचल आहे प्रामाणिकता. जी गोष्ट आतून खरी वाटत नाही, ती मी कितीही मोठी ऑफर असली तरी करत नाही. कधी पैशांसाठी निर्णय घेतले जातात, पण ते पुरेसं नसतं. उलट, काही प्रोजेक्ट्स मोठे नसतात, पण त्यामागचा हेतू आणि संदेश महत्त्वाचा वाटतो. तिथे मी ठाम राहते.”

तिने पुढे सांगितले की हे स्पष्टपणे निर्णय घेण्याचं सामर्थ्य तिला नेहमीच होतं असं नाही. “आज जे मला योग्य वाटतं, त्याबद्दल दहा वर्षांनी पुन्हा विचार बदलू शकतो. पण हा सगळा शिकण्याचा प्रवास आहे,” असं ती हसत म्हणाली. दीपिका सध्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘किंग’ (King) मध्ये ती सहाय्यक भूमिकेत झळकणार असून, या चित्रपटात सुहाना खान (Suhana Khan), अभिषेक बच्चन (Amitabh Bhachan) आणि राणी मुखर्जीही (Rani Mukherji) दिसणार आहेत. हा चित्रपट एप्रिल 2026 मध्ये रिलीज होणार आहे.

त्यानंतर ती अटली दिग्दर्शित प्रोजेक्टमध्ये दक्षिणातील सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट सध्या AA22xA6 या वर्किंग टायटलने ओळखला जातो आणि 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ