spot_img

Dashavatar Movie Oscar : मराठी लोककला थेट ऑस्करच्या व्यासपीठावर!

spot_img

मराठी सिनेमाच्या इतिहासात आज एक सोनेरी पान उमटलंय! सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत धडक मारलीये! जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडलेल्या फक्त १५० चित्रपटांच्या यादीत ‘दशावतार’ने स्थान मिळवलंय. हा पहिलाच मराठी चित्रपट आहे जो ऑस्करच्या ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’ contention list मध्ये समाविष्ट झालाय. मराठी मातीची ही झेप… खरंच अभिमानास्पद! दशावतार’ हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२५ सालातील मराठी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला! हा चित्रपट कोकणातील पारंपरिक ‘दशावतार’ लोककलेवर आधारित आहे. विष्णूच्या दहा अवतारांचं नाट्य सादर करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्याची, त्यांच्या संघर्षांची आणि परंपरेची ही कहाणी आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘बाबुली मिस्त्री’ ही मुख्य भूमिका साकारलीये, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, भारत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे असे दमदार कलाकार आहेत. चित्रपटाने मराठीतच नव्हे तर मल्याळममध्ये डब होऊन तिथेही प्रचंड यश मिळवलं.

दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी स्वतः सांगितलं की, अकादमीकडून ईमेल आला आणि ‘दशावतार’ ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेलाय. हा चित्रपट आता Academy Screening Room वर उपलब्ध आहे, जिथे अकादमी सदस्य त्याचं स्क्रीनिंग करून मतदान करतील. Zee Studios आणि Ocean Film Company ने याला ‘माइलस्टोन मोमेंट’ म्हणत कौतुकाचा वर्षाव केलाय.“लाल मातीतील जन्म, परंपरेच्या साथीने जगभरात पोहोचला… दशावतार ऑस्करकडे झेपावतोय!” असं त्यांनी म्हटलंय. भारतातून फक्त दुसरा चित्रपट (Homebound नंतर) जो contention list मध्ये आहे. पण मराठीसाठी हा पहिला! यापूर्वी मराठी चित्रपट फक्त इंटरनॅशनल फीचर कॅटेगरीसाठी पाठवले जायचे.

‘दशावतार’ फक्त मनोरंजन नव्हे, तर आपल्या समृद्ध संस्कृतीचा, लोककलेचा वारसा जपणारा चित्रपट आहे. एक वृद्ध कलाकार कसा आयुष्याच्या संकटांवर मात करतो, परंपरा कशी त्याला आधार देते… ही भावनिक कहाणी जगभरातील प्रेक्षकांना आवडली. दिलीप प्रभावळकरांची भूमिका तर अजरामर! त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना रडवलं आणि हसवलं. हा चित्रपट दाखवतो की, मराठी सिनेमा आता फक्त स्थानिक नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ