spot_img

Cross Leg Sitting : पायावर पाय टाकून बसणे ठरू शकतं धोकादायक ? दिसायला स्टायलिश असलेली सवय, आरोग्यावर करते कडक परिणाम

spot_img

रोजच्या सवयीतील ही ‘कंफर्टेबल पोझिशन’ शरीरातील रक्तप्रवाह, रक्तदाब आणि मणक्याच्या आरोग्यावर घालते ताण

अनेकांना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. काहींसाठी ही पोझिशन स्टायलिश तर काहींसाठी आरामदायी वाटते. पण तज्ज्ञांच्या मतानुसार ही सवय दिसायला आकर्षक असली तरी शरीरासाठी मात्र हानिकारक ठरू शकते. सतत पाय क्रॉस करून बसल्याने रक्तप्रवाहात बदल होतो आणि यामुळे अनेक शारीरिक तक्रारी सुरू होतात.

कामाच्या ठिकाणी किंवा घरी बसताना पाय क्रॉस करण्याची सवय सहज होत असते. पण या स्थितीत बराच वेळ बसल्यास पायातील शिरांवर दाब वाढतो, त्यामुळे सूज येऊ शकते आणि पाय सुन्न होऊ शकतात. विशेषतः गर्भवती महिलांसाठी ही सवय अधिक धोकादायक मानली जाते. कारण अशा वेळी रक्तप्रवाह आणखी मंदावतो आणि पाय सुजण्याची समस्या वाढते. काही प्रकरणांत गर्भाच्या स्थितीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सतत पायावर पाय टाकून बसण्याची आणखी एक समस्या म्हणजे रक्तदाब वाढणे. रक्तदाब अचानक वाढल्याने कंबर, पाठ आणि मणक्यांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे कंबरदुखी आणि पाठीचा त्रास वाढू शकतो. या पोझिशनमुळे कुल्हे आणि मांडीवरील दाब वाढून स्नायू असंतुलित होऊ शकतात.

काय कराल?

पायावर पाय टाकून बसण्याची सवय असेल तर दर 30 मिनिटांनी बसण्याची स्थिती बदला.

दर तासाला एकदा उठून चालून या, थोडी हालचाल करा.

पाय सरळ ठेवून बसण्याचा प्रयत्न करा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ