spot_img

Crime News : शिवशाही बस चालकाला बेदम मारहाण,घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ

spot_img

पुण्याहून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाला खडकी गावच्या हद्दीत चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बस चालक गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिवशाही बस पुण्याहून सोलापूरकडे नियमित फेरीसाठी निघाली होती. प्रवाशांना घेऊन जात असताना दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत अचानक एका चारचाकी वाहनाने बससमोर आडवी गाडी लावून बस थांबवण्यात आली. यानंतर चार ते पाच जणांनी बसमध्ये घुसून चालकाला जबरदस्तीने बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीत चालकाच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत इतर कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर आरोपी चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ