Crime News : भोंदू खरातने केलेली कोट्यवधींची फसवणूक उघड !

spot_img

धर्म आणि चमत्कारांच्या नावावर लोकांची दिशाभूल करणाऱ्या भोंदू खरातच्या गैरप्रकारांचा मोठा खुलासा समोर येत आहे. तपासात असे उघड झाले आहे की, त्याने अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

माहितीनुसार, आरोपी स्वतःकडे विशेष दैवी शक्ती असल्याचा दावा करत विविध वस्तू विकत असे. तो नागदेवतेची कृपा असल्याचे सांगून लोकांना आकर्षित करत होता. पुरुषांच्या शक्तिवर्धनासाठी बनावट औषधे “ओश्नोजल” या नावाने विकली जात होती, ज्यामध्ये संशयास्पद घटकांचा वापर केल्याचा आरोप आहे.

तपासात हेही समोर आले आहे की, साध्या दगडांना “दिव्य खडे” म्हणून लाखो रुपयांना विकले जात होते. याशिवाय, “तुर्की मध” म्हणून एका किलो मधाची किंमत तब्बल लाखो रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. तसेच, “मंतरलेल्या चिंचोकी” घरात ठेवल्यास समृद्धी येते, असा दावा करून त्या हजारो रुपयांना विकल्या जात होत्या.

या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, काही अघोरी विधींमध्ये वन्यजीवांशी संबंधित वस्तूंचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हा, कस्तुरी आणि हरणांच्या शिंगांसारख्या वस्तूंचा वापर केल्याचे संकेत मिळत आहेत.

याशिवाय, अनेक महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे तसेच काही लोकांच्या जमिनी बळकावल्याचे आरोपही या प्रकरणात करण्यात आले आहेत. अंधश्रद्धा पसरवून मोठे जाळे उभारल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आगामी काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ