spot_img

Crime News : चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू,बोगस डॉक्टर जेरबंद

spot_img

नवी मुंबई,विजय गायकवाड

नवी मुंबई (Navi Mumbai) येथून एक धक्कादायक आणि वैधकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वॉर्डबॉयने डॉकटर असल्याचे भासवून एका २१ वर्षीय तरुणीला चुकीच्या इंजेक्शन देण्यात आला. या इंजेकशनमुळे त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) असे त्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.

आरोपी संदेश पाष्टे हा मूळचा मानखुर्दचा रहिवासी असून तो अंधेरी येथील सिद्धि नर्सिंग होम होममध्ये केवळ वॉर्डबॉय म्हणून काम करतो. मात्र त्याच्याकडे कोणतेही वैधकीय पदवी नसतांना त्याने मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात तो स्वतःची ओळख ‘डॉक्टर’ म्हणून करून द्यायचा आणि रुग्णांवर उपचार करायचा. प्रचितीला हार्मोनल आजार होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला उपचारासाठी घरी बोलावले होते. 5 फेब्रुवारी रोजी संदेश प्रचितीच्या घरी गेला. त्याने तिला पहिले इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्याने पुन्हा दुसरे इंजेक्शन टोचले. दुसऱ्या इंजेक्शननंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती प्रचंड खालावली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

तरुणीचा मृत्यू तिच्या वडिलांना संशयास्पद वाटला, त्यामुळे भिकूराम गोविंद भुवड यांनी आरोपी संदेश यशवंत पाष्टे (रा. हिरानंदानी आकृती बिल्डिंग22/208 शिवाजीनगर लल्लूभाई कंपाउंड मानखुर्द) याच्या विरोधात वाशी तक्रार दिली. वाशी पोलिसांनी गु. र. क्र. 72/2026 कलम 105,319,(1),238 BNS अन्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी आरोपीला बेड्या ठोकल्या. प्रचितीला नेमकी कोणती औषधे टोचण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता आणि पदवीची शहानिशा करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. न्यायालयाने आरोला दि. 10 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शशिकांत चांदेकर पो. नि. जहागीर मुलांणी, सपोनि योगेश भोसले, पो. ह. बों-गाळे,सय्यद पथकाने सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ