spot_img

Sharad Ponkshe On Hinduism: मालेगावमध्ये टिपू सुलतानाच्या फोटोवरून वाद; शरद पोंक्षेंची तीव्र प्रतिक्रिया

spot_img

सांगलीतील कार्यक्रमात हिंदूंनी ‘हिंदूंसाठीच व्यवहार’ करावा, असे आवाहन

मालेगाव (Malegaon) महानगरपालिका येथे मुस्लिम उपमहापौरांनी दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी तीव्र शब्दांत टीका करत हिंदूंना जागे होण्याचे आवाहन केले आहे.

सांगलीत ‘हिंदू व्यवसाय बंधू’ आणि ‘सर्वमंगल ग्रुप’ यांच्या वतीने आयोजित गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पोंक्षे बोलत होते. त्यांनी म्हटले की, हिंदूंवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा फोटो शासकीय दालनात लावला जाणे ही गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोंक्षे यांनी आपल्या भाषणात इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा संदर्भ देत काही राजकीय नेत्यांवरही टीका केली. संविधानातील ‘सेक्युलर’ शब्द, मुस्लिम पर्सनल लॉ, वक्फ बोर्ड यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. १९४७ नंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी भविष्यातही विभाजनासारखी स्थिती उद्भवू शकते, असा इशारा दिला.

यावेळी त्यांनी आर्थिक व्यवहारांबाबतही ठाम भूमिका मांडली. घरगुती दुरुस्तीपासून रोजच्या खरेदीपर्यंत शक्यतो हिंदू व्यावसायिकांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महागाई किंवा इंधनदर वाढले तरी धर्माशी तडजोड करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपल्या भूमिकेचे समर्थन करताना पोंक्षे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला. धर्मासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत, कोणत्याही परिस्थितीत आपली धार्मिक ओळख जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, मालेगावमधील टिपू सुलतानाच्या फोटोप्रकरणी राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ