spot_img

Controversy Erupts Over Manoj Bajpayee’s ‘Ghuskhore Pandit’: ‘घुसखोर पंडत’वर FIR का दाखल? मनोज बाजपेयींच्या वेब फिल्मवर नेमका आक्षेप काय?

spot_img

समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर पोलिसांची कारवाई

अभिनेता मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘घुसखोर पंडत’ या वेब फिल्मभोवतीचा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर या वेब फिल्मचे दिग्दर्शक आणि संपूर्ण निर्मिती टीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

लखनऊ पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘घुसखोर पंडत’ या वेब फिल्मच्या शीर्षकामुळे विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्राह्मण समाजासह विविध सामाजिक संघटनांनी या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काही संघटनांनी आंदोलन आणि निषेधाचा इशाराही दिल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर हजरतगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक विक्रम सिंह यांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित ‘नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स’ या कार्यक्रमात या वेब फिल्मचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझर समोर येताच सोशल मीडियावर आणि विविध स्तरांतून टीका सुरू झाली आणि वादाला तोंड फुटले.

दरम्यान, या प्रकरणावर चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘घुसखोर पंडत’ ही एक काल्पनिक कथा असून ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाविरोधात नसून, केवळ एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांवर केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे वेब फिल्मच्या प्रदर्शनावर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ