कोलंबियामध्ये हवाई दलाचे एक लष्करी विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात सुमारे 110 जवान प्रवास करत होते. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळल्याचे समोर आले आहे.ही दुर्घटना पोर्तो लेगुइझामो, पेरू सीमेमोल घडली. लॉकहीड मार्टिन निर्मित C-130 हरक्युलिस प्रकारचे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे.
पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दक्षिण अमेझॉन भागातून उड्डाण करत होते आणि त्यात सशस्त्र दलाचे जवान होते. मात्र, या दुर्घटनेतील मृतांची किंवा जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघाताचे नेमके कारणही अजून समोर आलेले नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमान एका शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर कोसळले. दुर्घटनास्थळाचे काही व्हिडिओही समोर आले असून, बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, याआधी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बोलिव्हियामध्ये अशाच प्रकारचे C-130 विमान कोसळले होते. त्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.




