दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील 2 ते 4 दिवस दाट धुक्याचे वातावरण.

अनेक ठिकाणी किमान तापमान 5 ते 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. सध्या डोंगररांगांवर धुक्याची चादर पसरली असून, सकाळ-संध्याकाळची थंडी चांगलीच जाणवत आहे.

बंगालच्या (Bengal) उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 1 आणि 22 नोव्हेंबर रोजी दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप भागांत जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

ईशान्य भारतातील (Northeast India) मणिपूर, मिजोरम आणि नागालंडमध्येही हलकी ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. पश्चिम यूपी ते पूर्वांचलपर्यंत सकाळी दाट धुके आणि दिवसा हलक्या वाऱ्यांची शक्यता आहे.




