spot_img

CM Devendra Fadnavis : विश्वचषक विजेत्या सूर्या-शिवमचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव

spot_img

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईच्या दोन्ही क्रिकेटपटूंनी केली भेट; मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा.

टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबईचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा मानाचा किताब जिंकला. या विजयी संघात आणखी एक मुंबईकर क्रिकेटपटू शिवम दुबे याचाही समावेश होता.

विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही खेळाडूंना मिठी मारून त्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्यांनीही दोन्ही क्रिकेटपटूंना शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा आनंद व्यक्त केला

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ