spot_img

Chocolate Brownie : शुगर फ्री टेस्टी चॉकलेट ब्राऊनी बनवा घरच्या घरी!

spot_img

कधीकधी काहीतरी गोड खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही ही खास चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie) रेसिपी ट्राय करू शकता. वजन कमी करणारे किंवा फिटनेस फ्रिक लोक सुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात. गोड पदार्थ, हेल्दी, चांगल्या घटकांचा वापर करून ही खास चॉकलेट ब्राउनी बनवली जाते. या रेसिपीमध्ये डार्क चॉकलेट वापरले गेले आहे, ज्यामुळे ती अत्यंत हेल्दी असते आणि तुम्हाला गोड खाल्ल्याचा गिल्टही येणार नाही.

चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे योग्य प्रमाण –

गव्हाचे पीठ 2 टेबलस्पून
कोको पावडर (गोड नसलेले) 2 टेबलस्पून
शुगर फ्री स्वीटनर 2 ते 3 टेबलस्पून
बेकिंग पावडर 1/2 टीस्पून (किंवा चिमूटभर एनो)
ग्रीक योगर्ट 1 कप
दूध गरजेनुसार
चॉकलेट चिप्स
शुगर फ्री डार्क चॉकलेट 20 ते 30 ग्रॅम
बटर किंवा दूध 1 ते 2 टीस्पून

चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात सर्व कोरडे साहित्य एकत्र करा आणि चांगले मिसळा. ग्रीक योगर्ट आणि दूध हळूहळू घाला. घट्ट आणि गुळगुळीत बॅटर होईपर्यंत मिक्स करा. मध्यभागी चॉकलेट चिप्स घाला. नंतर ते बेक करा. तुम्ही एअर फ्रायरमध्ये बेक करत असाल तर 15 मिनिटांसाठी 160°C वर बेक करा. मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार असाल तर 3 ते 5 मिनिटे बेक करा आणि थोड्या थोड्या वेळाने ते तपासत रहा.शुगर फ्री डार्क चॉकलेट घ्या आणि ते थोडे बटर किंवा दुधासोबत वितळवा. गुळगुळीत आणि चमकदार होईपर्यंत ढवळत रहा. ब्राउनी बेक झाल्यावर वरतून चॉकलेट सॉस घाला आणि आनंद घ्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ