spot_img

Chief Justice B R Gavai : सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात वकिलांचा संताप

spot_img

उल्हासनगर तालुका वकिल संघटनेचे निषेध आंदोलन

सुप्रीम कोर्टातील (Superm Court) सुनावणी दरम्यान एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई (Bhsuhan gavai) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण न्यायव्यवस्था आणि कायदेतज्ज्ञ समाज हादरला असून, देशभरातून तीव्र निषेधाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उल्हासनगर तालुका वकील संघटनेतर्फे आज न्यायालयात दुपारनंतर काम बंद आंदोलन करण्यात आले.

नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सोमवारी चालू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान, उपस्थित असलेल्या एका वकिलाने अचानक संतापाच्या भरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. कोर्टातील सुरक्षारक्षकांनी तत्परतेने हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगामुळे काही वेळ न्यायालयाचे कामकाज थांबवावे लागले. या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, सर्वोच्च न्यायालयात देखील सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि सुरक्षेवर असा थेट आघात झाल्याने देशभरातील वकील संघटनांकडून निषेध नोंदवला जात आहे.

उल्हासनगर न्यायालयातही सोमवारी दुपारी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ उल्हासनगर तालुका वकील संघटनेतर्फे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. दुपारी दोननंतर वकिलांनी न्यायालय परिसरात एकत्र येत घोषणा देत आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड. संजय सोनवणे, उपाध्यक्ष सचिन खंडागळे, जय गायकवाड, राहुल बनकर, निलेश धिवरे, धनंजय मोहाड, पवन रोहरा यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, “सरन्यायाधीश हे न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे. अशा कृत्याचा तीव्र निषेध करत आम्ही आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करतो.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ