spot_img

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगर हळहळलं! मलगिरी महाराज यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

spot_img

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आयुर्वेदिक वनस्पतींच्या शोधासाठी मुर्डेश्वरच्या डोंगरावर गेलेले राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज (वय 58) यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या महाराजांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. कमलगिरी महाराज हे श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे ते सदस्य होते. जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट क्रमांक 28 मध्ये त्यांचा मठ असून ते आयुर्वेद, साधना आणि समाजसेवेसाठी ओळखले जात होते. या घटनेमुळे हरिओमनगरसह, केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दरीतून अडकलेल्या अवस्थेतही कमलगिरी महाराजांनी पत्नी आणि मुलगा वैभव यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. मात्र, डोंगराळ व दुर्गम भागामुळे मुलाला घटनास्थळी पोहोचण्यास दुपारचे 4 वाजले. अखेर महाराजांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून सिल्लोड येथील रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमलगिरी महाराजांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ