spot_img

Chandrika Dixit Husband : वडापाव गर्लने पतीवर केले गंभीर आरोप; नवऱ्याने केलं चीट?

spot_img

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकताना ग्राहकांशी हुज्जत घालणारी आणि तिथून थेट ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या घरापर्यंत पोहोचलेली चंद्रिका दीक्षित (Chandrika Dixit) ने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण यावेळी हे वादाचं कारण वडापाव नसून तिचं खाजगी आयुष्य आहे.”माझा पती, माझं प्रेम… आता माझं काय उरलं?” असं म्हणत रडणाऱ्या चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या युगमने तिच्या संघर्षाच्या काळात खंबीर साथ दिली, तोच आता दगा देत असल्याचा दावा तिने केला आहे.

चंद्रिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने युगमचे काही चॅट्स आणि एका दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो उघड केले आहेत. ती म्हणते, “मी घराबाहेर पडते, काम करते, मुलाला सांभाळते आणि तुम्ही हे उद्योग करताय? गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सहन करतेय.” चंद्रिकाच्या या आरोपांमुळे नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींना तिच्याबद्दल सहानुभूती वाटतेय, तर काहींना हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला एक पब्लिसिटी स्टंट वाटतोय. चंद्रिकाने इतके गंभीर आरोप करूनही युगम गेराने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण कायदेशीर वळण घेणार की सोशल मीडियावरच संपणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ