spot_img

मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आणलेली रोकड जप्त,नालासोपाऱ्यात रात्री काय घडलं?

spot_img

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात (Nala Sopara) मोठी खळबळ उडाली आहे. पेल्हार फाटा परिसरात तब्बल दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड भाजपाची असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून मतदारांना वाटप करण्यासाठी ती नेली जात होती का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मंगळवारी रात्री सुमारे दोनच्या सुमारास पेल्हार फाटा येथे एका संशयित इसमाच्या हालचाली नागरिकांच्या लक्षात आल्या. संशय बळावल्याने काही स्थानिक नागरिकांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली. त्यानंतर घटनेची माहिती तात्काळ पेल्हार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताच्या वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये भाजपाचा लोगो असलेली पिशवी आढळून आली.

या पिशवीमध्ये आणखी एक प्लास्टिकची पिशवी ठेवण्यात आली होती. तपासणीदरम्यान या पिशवीतून रोख दहा लाख रुपये सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही रक्कम कोणत्या उद्देशाने नेली जात होती, याबाबत समाधानकारक माहिती संशयिताकडून मिळू शकलेली नाही. त्यामुळे ही रोकड निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठीच नेली जात असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्हिडीओनुसार, एका बंद पाकिटात ही रक्कम ठेवण्यात आली होती. अशी अनेक बंद पाकीटे जप्त करण्यात आली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ