spot_img

Budget 2026 : निर्मला सीतारमण यांचा सलग नववा अर्थसंकल्प; जाणून घ्या काय स्वस्त झालं आणि काय महागलं

spot_img

सामान्यांच्या खिशाला दिलासा, काही वस्तू स्वस्त तर काहींचे दर वाढले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प 2026 सादर केला. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिक, उद्योग क्षेत्र आणि निर्यातदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पानंतर कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार, याकडे नागरिकांचं विशेष लक्ष लागलं होतं.

या अर्थसंकल्पात सीमा शुल्कात (कस्टम ड्युटी) कपात आणि विविध सवलती जाहीर करण्यात आल्यामुळे दैनंदिन वापरातील तसेच आरोग्य, प्रवास आणि निर्यातीशी संबंधित अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य ग्राहकांसह विविध उद्योगांना दिलासा मिळणार आहे.

  • बीडी
  • बुट आणि पादत्राणे
  • कपड्यांची निर्यात
  • CNG
  • परदेशी प्रवास
  • चामड्याची निर्यात
  • बायोगॅस
  • ओवन आणि संबंधित उपकरणे
  • बॅटरी
  • ७ गंभीर आजारांवरील औषधे
  • मधुमेहावरील औषधे
  • मच्छिमारांसाठी निर्यात प्रक्रिया
  • परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च

याउलट, काही वस्तूंवर करभार वाढवण्यात आल्यामुळे त्या महाग होण्याची शक्यता आहे.

महाग होणाऱ्या वस्तू :

  • दारू
  • सिगारेट
  • खनिजे
  • स्क्रॅप

या अर्थसंकल्पातील निर्णयांमुळे एकीकडे आरोग्य, ऊर्जा, शिक्षण आणि निर्यात क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे व्यसनाधीन वस्तूंवर दरवाढ करून महसूल वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो. एकूणच, अर्थसंकल्प 2026 मध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देतानाच अर्थव्यवस्थेला गती देण्यावर भर देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ