spot_img

Ghooskhor Pandit Controversy Explained : मनोज बाजपेयी यांच्या चित्रपटाला देशभरातून का होतोय विरोध?

spot_img

सध्या सोशल मीडियावर एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे नाव आहे – ‘घुसखोर पंडत’. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या नावावरून रणकंदन माजलंय. ब्राह्मण समाजातल्या काही संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केलाय. त्यांचा आरोप आहे की, यातून ब्राह्मण समाजाची बदनामी केली जात आहे. पण, प्रश्न फक्त एका चित्रपटाचा नाहीये. प्रश्न आहे तो चित्रपटसृष्टीतील ‘सिलेक्टिव्ह’ विरोधाचा. जेव्हा एखाद्या चित्रपटात पाटील गुंड असतो, यादव खलनायक असतो किंवा शिंदे-पवार लाचखोर पोलीस असतात, तेव्हा हेच ब्राह्मण गप्प का असतात?

‘घुसखोर पंडत’ या नावावरूनच वादाची ठिणगी पडली आहे. ‘पंडत’ किंवा ‘पंडित’ या शब्दाचा संबंध थेट ब्राह्मण जातीशी जोडला जातोय. विरोध करणाऱ्या ब्राह्मणांचे म्हणणे आहे की, एका ब्राह्मणाला ‘घुसखोर’ किंवा ‘लाचखोर’ दाखवणे म्हणजे संपूर्ण समाजाचा अपमान आहे. पण, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, असं आपण म्हणतो ना? मग समाजात जर भ्रष्टाचार असेल, तर तो पडद्यावर दाखवताना जात आडवी का येते? आजवर शेकडो चित्रपटांत ब्राह्मणांना आदर्शवादी, बुद्धिमान आणि ‘शाकाहारी’ सात्विक रूपातच पाहण्याची प्रेक्षकांना सवय लावली गेली आहे. पण जेव्हा त्याच चौकटीला छेद देणारा एखादा चित्रपट येतो, तेव्हा मात्र यांचा तिळपापड होतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ‘पाटील’ हे आडनाव सन्मानाचे मानले जाते. पण मराठी चित्रपटसृष्टीने पाटलांना कसं रंगवलंय? जुन्या काळातील चित्रपटात गावातील जुलमी सावकार ‘पाटील’ असायचा. अगदी अलीकडच्या ‘दुनियादारी’ चित्रपटाचं उदाहरण घ्या. कॉलेजमधील दादागिरी करणारा, गुंड प्रवृत्तीचा मुलगा कोण दाखवलाय? दिग्या-दिगंबर शंकर पाटील! आणि अभ्यासू, चांगल्या घरातला, गुंडगिरी-मारामारीपासून दूर असलेला कोण तर तो ब्राह्मण! इतकंच कशाला, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ‘यादव’ जातीला गुंड, बाहुबली किंवा भ्रष्ट राजकारणी म्हणून दाखवण्याची एक फॅशनच बॉलीवूडमध्ये रूढ झाली आहे. ‘गंगाजल’ असो वा ‘शूल’, यादवांना नेहमीच खलनायक म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. जेव्हा पाटलांना गुंड दाखवलं जातं किंवा यादवांना व्हिलन बनवलं जातं, तेव्हा हीच ब्राह्मण मंडळी चित्रपटगृहात शिट्ट्या वाजवत तो चित्रपट एन्जॉय करतात. तेव्हा त्यांना कोणत्याही जातीची बदनामी दिसत नाही. मग आज ‘पंडत’ शब्दावर इतका आक्षेप का?

तुम्ही कोणताही क्राईम थ्रिलर किंवा कमर्शियल सिनेमा उघडून पहा. त्यात जो पोलीस हवालदार किंवा इन्स्पेक्टर लाच घेताना दाखवला जातो, त्याचं आडनाव काय असतं? शिंदे, पवार, कदम, कांबळे, गायकवाड किंवा मोरे! ही सर्व बहुजन समाजातील आडनावं आहेत. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा अशा आडनावांच्या माध्यमातून ‘भ्रष्ट’ म्हणून रंगवली गेली, तेव्हा कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. कोणत्याही ब्राह्मण संघटनेने पत्रक काढून निषेध केला नाही की, “बहुजांना लाचखोर का दाखवताय?” उलट, अशा पात्रांवर विनोद केले गेले, त्यांची खिल्ली उडवली गेली. पण जेव्हा स्वतःच्या समाजावर बोलायची वेळ येते, तेव्हा मात्र हे ‘धोरण’ बदलतं. इतरांच्या जखमेवर मीठ चोळताना ज्यांना मजा येते, त्यांना स्वतःच्या हाताला लागलेला ओरखडाही सहन होत नाही, हेच यातून सिद्ध होतंय.

हा सगळा प्रकार म्हणजे ‘सांस्कृतिक दहशतवाद’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ठराविक जातींच्या विरोधात काहीही चालतं, कारण त्या जातींना बदनाम करण्याची एक अघोषित संमती समाजात तयार झाली आहे. पण ब्राह्मण समाजाबद्दल बोलताना मात्र ‘पवित्रता’ जपली पाहिजे, असा हा अट्टाहास का? ब्राह्मण म्हणजे फक्त वेद-पुराण पाठ करणारा किंवा मंदिरात पूजा करणाराच असतो का? तो माणूस नाहीये का? त्याच्याकडून चुका होऊ शकत नाहीत का? मग त्याला पडद्यावर ‘ग्रे शेड’मध्ये दाखवायला भीती का वाटते? किंवा तस दाखवल्यावर विरोध का होतो? काय देशात भ्रष्ट ब्राह्मण नाहीत? फार पूर्वीचे उदाहरण देणार नाही. सौरभ शर्मा या सध्या कॉन्स्टेबलच नाव तुम्ही ऐकलच असेल. 28 हजार रुपयांच्या नोकरीतून 400 कोटींची संपत्ती कशी उभी राहते? भारताबाहेर जमिनी घेणं कस शक्य होत, इमानदारीच्या पैशांनी? उत्तर प्रदेशातील हिस्ट्रीशीटर विकास दुबे हा काय संत माणूस होता? अशी कितीतरी उदाहरणं देत येतील.

खरं तर हा वाद चित्रपटाच्या कथेपेक्षा जास्त ‘अहंकाराचा’ आहे. “आम्ही श्रेष्ठ आहोत आणि आम्हाला कोणीही प्रश्न विचारू शकत नाही,” ही जी ब्राह्मणवादी मानसिकता आहे, तीच या विरोधाच्या मुळाशी आहे. पाटलांच्या गुंडगिरीवर टाळ्या वाजवणारे लोक जेव्हा पंडतच्या लाचखोरीवर चिडतात, तेव्हा त्यांचं बेगडीपण उघड पडतं. काय ब्राह्मण लाचखोर नाहीत? प्रदीप कुर्लकरासारखे काही ब्राह्मण तर देशद्रोहीदेखील आहेत. गांधींची हत्या करणारा गोडसेसारखा ब्राह्मण दहशतवादीदेखील आहे. त्यामुळे सर्वच ब्राह्मण चांगले आहेत अस म्हणणं योग्य नाही. मुळात देवाच्या नावाने आलेला प्रसाद, पैसे, वस्तू यांचा स्वतःसाठी वापर करणं तर देवाची फसवणूक आहे. देवाच्या नावाने घेतलेले 11 रुपये ही तर चक्क देवासमोर घेतलेली लाच आहे.

‘घुसखोर पंडत’ हा चित्रपट चांगला आहे की वाईट, हे तो प्रदर्शित झाल्यावरच ठरेल. पण त्याआधीच जातीच्या नावाने त्याला विरोध करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. जर तुम्हाला पाटलांना गुंड दाखवल्याने फरक पडत नसेल, जर तुम्हाला पवारांना-कांबळेंना लाचखोर दाखवल्याने त्रास होत नसेल, तर तुम्हाला ‘पंडता’ला घुसखोर दाखवल्यानेही त्रास व्हायचा अधिकार नाही. सिनेमा हा सिनेमा म्हणून पहा. जर चित्रपट चांगला नसेल तर प्रेक्षक त्याला नाकारतीलच, पण जातीच्या नावाखाली सेन्सॉरशिप लादणे हे देशाच्या पुरोगामी संस्कृतीला साजेसे नाही. भारतीय चित्रपटांनी नेहमीच बहुजनांचा अपमानच केला आहे. जिवाजी महाले यांनी छ.शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. त्यानंतर एक म्हण प्रचलित केली गेली, होत जीव म्हणून वाचला शिवा, इथे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अस म्हणता येऊ शकल असत. पुढे जिवा-शिवाची बैल जोड, अस गाणं आलं. हा छ.शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? यावर कोणी का नाही बोललं? चित्रपटसृष्टी खरंच ब्राह्मणांना टार्गेट करते का? हा प्रश्नच आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ