spot_img

Border 2 : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बॉर्डर ३’ चित्रपट; कधी होणार होणार?

spot_img

थिएटरमध्ये सध्या फक्त एकच आवाज घुमतोय. तो म्हणजे ‘हिंदुस्तान जिंदाबाद’चा. सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ (Border २) ने बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ घातला आहे की, जुन्या रेकॉर्ड्सच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पण चित्रपटप्रेमींसाठी हा तर फक्त ट्रेलर होता. कारण ‘बॉर्डर २’ च्या यशाची चव चाखत असतानाच, निर्माते भूषण कुमार यांनी एका सिनेमाबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘बॉर्डर ३’ लवकरच येणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘बॉर्डर २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच जगभरात १६७ कोटी रुपयांचा गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली आहे. टी-सीरीज आणि अनुराग सिंह यांची ही पहिलीच भागीदारी प्रेक्षकांना वेड लावून गेली आहे. तब्बल २९ वर्षांनंतर जेव्हा ‘संदेसे आते हैं’ची धून पुन्हा मोठ्या पडद्यावर ऐकू आली, तेव्हा प्रत्येक भारतीयाचं रक्त सळसळलं. प्रेक्षकांचं हेच प्रेम पाहून भूषण कुमार यांनी तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. केवळ पुरुष कलाकारांनीच नाही, तर सोनम बाजवा हिनेही आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १९९७ च्या मूळ ‘बॉर्डर’चा वारसा या चित्रपटाने अत्यंत ताकदीने पुढे नेला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ