1998 च्या क्लासिक ‘बॉर्डर’ सिनेमानंतर ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना खूप प्रतिक्षा होती. अखेर आज 23 जानेवारी रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. जर तुम्हाला हा चित्रपट कसा आहे असा प्रश्न पडत असेल तर पहिल्या रिव्हूमध्येच सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटलं आहे. व्यापार तज्ज्ञ आणि समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सिनेमाचा सविस्तर रिव्ह्यू शेअर केला. ज्यात त्यांनी सिनेमाला 4.5 स्टार दिले. सिनेमाबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे पाहूयात. तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी लिहिलंय,”बॉर्डर 2 तुमचे हृदय अभिमानाने भरून टाकतो. हा सिनेमा देशाला तसेच सशस्त्र दलांना सलाम करतो. जोरदार शिफारस केली जाते.” त्यांनी दिग्दर्शक अनुराग सिंग यांचे कौतुक करत म्हटलंय, “त्यांनी एक शक्तिशाली, भावनिकदृष्ट्या भरलेला युद्धकथा सादर केली आहे हा सिनेमा कल्ट क्लासिक ‘बॉर्डर’ च्या वारशाचा सन्मान करतो.”
सिनेमाच्या वॉर सीन्सचं विशेषतः कौतुक होत आहे. तरण आदर्श यांनी लिहिलंय, सिनेमातील अॅक्शन सीन्स केवळ दाखवण्यासाठी नाही तर कथा आणि पात्रांच्या भावना पुढे नेण्यासाठी काम करते. त्यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये संवाद आणि संगीत हे चित्रपटाचे प्रमुख बलस्थान असल्याचं सांगितलं आहे. तरण आदर्श यांच्या मते, सिनेमाचे संवाद तीक्ष्ण, कठोर आणि देशभक्तीने भरलेले आहेत. अनेक पंचलाइनला थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मिळत आहे. सिनेमात पहिल्या भागातील ‘घर कब आओगे’ आणि ‘जात हुए लम्हो’ ही गोणी रिक्रिएट करण्यात आली आहे.




