spot_img

Bollywood Movie : तुंबाड नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘मयसभा’! बॉलिवूडचा कोणता मोठा कलाकार साकारणार मुख्य पात्र?

spot_img

२०१८ मध्ये राही बर्वे (Rahi Barve)दिग्दर्शित तुंबाड (Tumbad) चित्रपट लोकांच्या भेटीस आला होता. त्यावेळी या चित्रपटाला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. यानंतर मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड पब्लिसिटी करण्यात आली. ज्यामुळे २०२४ मध्ये हा चित्रपट दुसऱ्यांदा प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या वेळी तुंबाडला घवघवीत यश मिळाल्याने आता राही बर्वे यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मयसभा’ अशा नावाचा चित्रपट ते घेऊन येत आहेत.

सोशल मीडिया (Socia Media)हँडलवर राही बर्वे यांनी त्यांच्या या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. ज्यात एक म्हातारा माणूस तोंडावर मास्क लावून श्वास घेताना दिसतोय आणि राही यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘दशकभरापूर्वी, आम्ही एक वेडेपणा उघड केला व एक असा प्रयोग जो खूपच विचित्र आहे. या प्रयोगाचं महत्व शब्दात सांगता येण्यासारखं नाही. अखेर हा शाप मोडला आहे आणि परमेश्वर खन्नाचे (जावेद जाफेरी) रहस्यमय जग अखेर प्रकाशात येणार आहे. सोन्यासाठी जो शोध सुरु होणार आहे, त्याचा आनंद घ्या’. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यामध्ये परमेश्वर खन्ना नावाचं पात्र साकारणार असल्याचं समजत. पोस्टरमध्ये जावेद जाफरीचा जबरदस्त लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्याबरोबरच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार आणि हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही. मात्र या पोस्टरवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे पोस्टर एआय वरील वाटत आहे तर याविरुद्ध काहींनी चित्रपटाबाबत उत्सुकता हि व्यक्त केली आहे. तुंबाडनंतर आत्ता मयसभाच्या माध्यमातून नवीन भन्नाट कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. लोक हे पाहण्यास उत्सुक आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ