गेल्या अनेक दिवसांपासून ‘इक्कीस’ (Ikkis) या सिनेमाची चर्चा बरीच रंगत होती. या चित्रपटातून बॉलिवूडचे (Bollywood)महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)यांचा नातू ‘अगस्त्य नंदा रुपेरी’ पडद्यावर पदार्पण करतो आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं होतं. जे पाहिल्यानंतर प्रेक्षकांची व चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. यानंतर आता नुकताच ’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंगावर काटा आणणारी भारतीय सैन्याच्या पराक्रमाची गोष्ट या सिनेमातून बघायला मिळणार आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच भारतीय सैन्यातील एक जवान त्याचे कर्तव्य बजावतानाआपल्याला दिसतो. आपल्या रेजिमेंटसाठी मी परमवीर चक्र घेऊन येईल, असे म्हणतो. 2 मिनिट 39 सेकंदाचा हा ट्रेलर लोकांच्या अंगावर काटा आणतो. या सिनेमात अगस्त्य नंदा परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारतो आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये त्याची भूमिका अनेकांना मेजर अरुण यांची आठवण करून देते.
हा सिनेमा देशभक्तीवर आधारित असून, जवानाची प्रेमकहाणीदेखील दाखवण्यात आली आहे. ट्रेलरच्या शेवटी मेजर अरुण त्यांच्या वाढदिवसाचा केक कापताना देखील दाखवले आहेत. त्याचवेळी एक वरिष्ठ अधिकारी येतात आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वय विचारतात. ज्यावर मेजर उत्तर देतात, ‘एक्कीस’ आणि त्याचसोबत त्याला विचारतात, ‘युद्ध होणार आहे का?’
श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला असून त्यांचे ‘बदलापूर’, ‘अंधाधून’ सारख्या सिनेमे लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा इक्कीस या सिनेमात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिका साकारतो आहे. त्याचसोबत धर्मेंद्र आणि जयदीप अहलावत हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. याचवर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार असून ट्रेलरनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत.




