spot_img

BMC Election : भाजप उमेदवाराने पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप; बोरिवलीतील राजेंद्र नगरमध्ये दोन गटात तुफान राडा

spot_img

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी बोरिवलीतील राजेंद्र नगर भागात (प्रभाग क्रमांक १४) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप उमेदवार सीमा शिंदे यांच्याकडून एका हॉलमध्ये जेवणावळ आणि पैसे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते नयन कदम यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात रात्री उशिरा मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मनसेचा आरोप आहे की, मंगळवारी रात्री प्रचार थांबल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एका स्थानिक हॉलमध्ये मोठ्या जेवणावळीचे आयोजन केले होते. “आम्ही हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला अडवले. भाजपचे लोक पैसे वाटप करत होते, मात्र पोलिसांच्या मदतीने त्यांना पळवून लावण्यात आले,” असा दावा नयन कदम यांनी केला आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी लोक गाड्यांतून येत होते, थेट आत जाऊन बाहेर पडत होते आणि कोणताही संवाद किंवा जेवण न करता लगेच निघून जात होते. यामुळे पैसे वाटपाचा संशय बळावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, कार्यक्रमस्थळी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी काही लोकांना गेटवर तैनात करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान अशा प्रकारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

मनसेच्या पैसे वाटपाचे सर्व आरोप भाजप उमेदवार सीमा शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. मनसेचे आरोप फेटाळून लावताना सीमा शिंदे यांनी मनसैनिकांवर उलट आरोप करत मनसेच्या ५०-६० कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. बोरिवलीतील भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मनसेवर आरोप करताना म्हटले की, सीमा शिंदे यांच्या मनसेकडून 50 ते 60 लोकांच्या जमावाने शिवीगाळ आणि हल्ला केला. महिलेवर हल्ला करणारा ही मनसेची कुठली संस्कृती अशा देखील प्रश्न आमदार संजय उपाध्याय यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ