spot_img

BMC Election 2026 : “मुंबईत कमळ फुललं, रसमलाई ठरली ट्रेन्डची स्टार! निकालानंतर राजकीय टोलेबाजीला उधाण”

spot_img

बीएमसी निवडणूक निकालांनंतर ‘रसमलाई’ ट्रेन्ड, अन्नामलाईंच्या प्रचाराचा भाजपला फायदा, मनसेची कामगिरी फिकी

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठा उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता संतुलन आपल्या बाजूने झुकवलं आहे. दोन्ही पक्षांनी मिळून तब्बल 118 जागांवर विजय मिळवला असून यामध्ये भाजपने 89, तर शिंदे गटाने 29 जागा पटकावल्या आहेत. दुसरीकडे मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

या निकालानंतर सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेन्ड चर्चेत आला आहे. तो म्हणजे ‘रसमलाई’. निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडू भाजपचे नेते के. अन्नामलाई मुंबईत प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगात्मक शैलीत ‘रसमलाई’ या शब्दाचा वापर करत अन्नामलाईंवर निशाणा साधला होता. मात्र आता निकालानंतर चित्र बदलले आहे.

ज्या-ज्या भागात अन्नामलाई यांनी प्रचारसभा घेतल्या, त्या भागात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप ओडिशाचे नेते पीसी मोहन यांनी सोशल मीडियावर रसमलाईचा फोटो शेअर करत “काही रसमलाई ऑर्डर केली” असा टोला लगावला आहे.

निकालांनंतर सोशल मीडियावर #Rasmalai आणि #Annamalai हे हॅशटॅग जोरदार व्हायरल होत असून, विविध मिम्सद्वारे राजकीय टोलेबाजी रंगताना दिसत आहे. बीएमसी निकालांमुळे मुंबईतील सत्तासमीकरण बदलले असतानाच, ‘रसमलाई वाद’ राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ