spot_img

 Bigg Boss Marathi Fame Jay Dudhane : बिग बॉस फेम जय दुधाणे हर्षला पाटीलसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार

spot_img

‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलचा साखरपुडा; हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

डिसेंबर महिन्याची चाहूल लागताच लग्नसराईचा माहोल रंगू लागतो. सनई-चौघड्यांच्या गजरात अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला आणि आता आणखी एका बिग बॉस फेम अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणे (Jay Dudhane) याचा साखरपुडा त्याची गर्लफ्रेंड हर्षला पाटील (Harshala Patil) हिच्याशी पार पडला आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा साखरपुडा सोहळा पार पडला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साखरपुड्यानंतर लगेचच जय आणि हर्षलाच्या हळदीचा कार्यक्रमही पार पडला असून चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलविषयक कंटेंटसाठी ती ओळखली जाते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी मार्च महिन्यात उत्तराखंडच्या ट्रिपदरम्यान जयने हर्षलाला अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

‘बिग बॉस मराठी’व्यतिरिक्त जय दुधाणेला एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला या शोमुळेही प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोचे विजेतेपद त्याने पटकावले होते. त्यानंतर ‘वेड लागलं प्रेमाचं’ आणि ‘गडद अंधार’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तो झळकला. लवकरच जय महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजनसृष्टीत लग्न आणि साखरपुड्यांचा उत्सव सुरू आहे. प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड, कोमल कुंभार, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांनी लग्नगाठ बांधली, तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा नुकताच साखरपुडा पार पडला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ