spot_img

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद

spot_img

बिग बॉसचा आदेश धुडकावला, शाब्दिक चकमकीने घरात रंगला पहिल्याच दिवसाचा ‘राडा’

बिग बॉसचं घर म्हणजे ड्रामा, वाद, गटबाजी आणि गॉसिप यांचं हक्काचं व्यासपीठ. 11 जानेवारीपासून सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात हे सगळं पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. नवीन सीझन सुरू होताच प्रेक्षकांमध्ये कोण कुणाचा मित्र, कुणाचा शत्रू आणि कोणते गट तयार होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहिल्याच दिवशी काही स्पर्धकांनी बिग बॉसच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे घराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी घरातील वातावरण तापवणारी एक शाब्दिक झटापटही घडली.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये करण सोनवणे आणि रुचिता जामदार गप्पा मारताना दिसतात. स्विमिंग पूलबाबत करण केलेल्या एका वक्तव्यावर तो थोडा विनोदी अभिनय करतो. हे बोलणं ऐकून तन्वी कोलते तिथे येते आणि “फालतू शब्द वापरू नकोस” असं म्हणते. यावरून रुचिता आणि तन्वी यांच्यात जोरदार वाद सुरू होतो.

रुचिता तन्वीला टोमणा मारत म्हणते की, “तुम्ही कायम शस्त्र घेऊन तयार असता.” यावर संतापलेली तन्वी तिला मर्यादा ओलांडू नकोस असं बजावते. वाद इतका वाढतो की दोघींमध्ये तिखट शब्दांची देवाणघेवाण होते. अखेर इतर स्पर्धकांना मध्ये पडून हा वाद शांत करावा लागतो. हा प्रोमो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “पहिल्याच दिवशी भांडण सुरू,” “उद्घाटनालाच राडा,” “कोल्हापुरी दणका” अशा मजेशीर कमेंट्स प्रेक्षक करताना दिसत आहेत.

या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामध्ये तन्वी कोलते, रुचिता जामदार, करण सोनवणे यांच्यासह दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, सागर कारंडे, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर यांचा समावेश आहे. पहिल्याच दिवसाच्या या घडामोडींमुळे बिग बॉस मराठी 6 मध्ये पुढे काय काय रंगणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ