spot_img

Bigg Boss 19 Final : बिग बॉस 19 चा आज महामुकाबला होणार ; ट्रॉफीसाठी टॉप 5 स्पर्धकांमध्ये चुरस सुरू

spot_img

सलमान खान सूत्रसंचालित शोचा ग्रँड फिनाले आज रात्री; कोण ठरेल जनतेचा खरा विजेता?

‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले शेवटी समोर आला असून आता विजेता कोण ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलमान खानचा हा वादग्रस्त पण लोकप्रिय रिअॅलिटी शो या सीझनमध्ये भरपूर गाजला आणि अखेर टॉप 5 स्पर्धक निश्चित झाले आहेत— तान्या मित्तल, अमाल मलिक, गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे.

सुमारे 106 दिवसांच्या प्रवासानंतर हे पाच स्पर्धक अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा प्रेक्षकांचा उत्साह कमालीचा वाढत चालला असून प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सोशल मीडियावर आणि मतदानात सक्रिय आहे.

शोच्या अलीकडील भागात टॉप 5 चा संपूर्ण प्रवास व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे—विजेता कोण ठरेल याबाबत कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. पाचही स्पर्धकांची शर्यत तितकीच तगडी दिसत आहे. आज, 7 डिसेंबर, ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक धमाकेदार डान्स परफॉर्मन्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

  • रात्री 9 वाजता – फिनाले जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होईल
  • रात्री 10.30 वाजता – फिनाले भाग कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल

अंततः कोणाचा मुकुट शोभेल आणि कोण घरी नेईल चमकणारी ‘बिग बॉस 19’ ट्रॉफी, हे आजच उलगडणार आहे.

दरम्यान, प्रेक्षकांना त्यांचा आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी ऑनलाईन मतदान करण्याची संधी आहे. ‘बिग बॉस 19’ असे शोधल्यावर ‘Vote Now’ वर क्लिक करा आणि दिसणार्‍या टॉप 5 स्पर्धकांच्या फोटोंमधून आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊ शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ