spot_img

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दीपक चाहरची धमाकेदार एंट्री ; प्रणित मोरेची मजेशीर केली पोलखोल

spot_img

फॅमिली वीकमध्ये घरभर भावनिक क्षण; दीपकच्या रोस्टमुळे रंगला हास्याचा माहोल, चाहत्यांच्या कमेंट्सचीही भरघोस गर्दी

बिग बॉस 19 (Bigg Boss 19) च्या घरात नुकताच फॅमिली वीक रंगून गेला आणि त्यामुळे घरात भावनिक व आनंदाची एक वेगळीच लहर पाहायला मिळाली. स्पर्धकांच्या कुटुंबियांच्या भेटीने प्रत्येकाचं मन भरून आलं. शेवटी फिल्ममेकर मालती चाहरचा भाऊ आणि टीम इंडिया क्रिकेटपटू दीपक चाहर घरात दाखल झाला आणि घरातील वातावरण आणखी रंगतदार बनलं.

दीपकने आत येताच सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या उपस्थितीने घरातील क्रिकेट फॅन्सही खुश झाले. पण याचदरम्यान दीपकचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दीपक (Deepak), प्रणित मोरेची (Pranit More) भन्नाट पोलखोल करताना दिसतो. प्रणित बिग बॉसमध्ये इतरांना शिव्या देऊ नका म्हणतो, हे पाहून दीपक चांगलाच खोचक अंदाजात म्हणतो, “मी त्याचा शो पाहिलाय. तुम्ही सगळ्यांनी मिळून जशा शिव्या दिल्या नसतील, तितक्या तो एका रीलमध्ये देतो. आणि इथे मात्र उपदेश!” हे ऐकून घरात हशा पिकतो. प्रणितही हसतच उत्तर देतो की तो आपल्या शोबद्दल आधीच बोलून झाला आहे. मालती चाहरही भावाच्या बोलण्याला साथ देते.

नंतर दीपक मजेत पुढे म्हणतो की प्रणित जेव्हा शोमध्ये शिव्या देतो तेव्हा त्या प्रेक्षकांसाठी असतात, पण बिग बॉसमध्ये शिव्या थेट एकमेकांनाच दिल्या जातात, त्यामुळे त्याचा मुद्दा काही अंशी खरा वाटतो. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंटमध्येही मस्त मजा केली आहे.

दरम्यान, मालती चाहरची घरात सर्वात जास्त जमलेली मैत्री प्रणित मोरेशी झाली. यावर दीपकनेही गंमतीशीर प्रतिक्रिया देत म्हटले की, “प्रणितने मालतीशी मैत्री करून घेतली म्हणजे त्याचाच फायदा आहे. आता क्रिकेटर्सना रोस्ट करण्याचा त्याचा धोका कमी! क्रिकेटपटूंच्या बहिणीशी मैत्री असेल तर तो सेफ!” हा सगळा मजेशीर एपिसोड पाहून प्रेक्षकांची एन्जॉयमेंटही दुप्पट झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ