spot_img

Bhandup : भांडुपच्या विराज मर्गजची राज्यस्तरीय कबड्डीत दमदार एंट्री

spot_img

पुणे येथे होणाऱ्या 52 व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर (पूर्व) कबड्डी संघात भांडुपचे विराज प्रल्हाद मर्गज (Viraj Prahlad Margaj) याची निवड झाली असून, सिंधुदुर्गातील कुडाळ (Kudal) तालुक्यातील पांग्रड या छोट्याशा गावासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत विराज आपली कौशल्यपूर्ण खेळी सादर करणार आहे.

कबड्डीच्या मैदानावर स्वतःची मजबूत ओळख निर्माण करत, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विराजने राज्यस्तरावर आपली छाप उमटवली आहे. पांग्रडसारख्या ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात येऊन क्रीडा क्षेत्रात स्थान मिळवणे ही सोपी गोष्ट नाही; पण विराजने आपल्या जिद्दीच्या बळावर ही काठिण्याची वाट यशस्वीपणे पार केली आहे.

भांडुपमधील ‘उत्कर्ष क्रीडा मंडळा’त मिळालेलं टप्प्याटप्प्याने प्रगल्भ होत गेलेलं प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे सूक्ष्म मार्गदर्शन आणि कुटुंबाने दिलेला पाठिंबा हे विराजच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ ठरले.

स्थानिक स्तरापासून जिल्हास्तर, आणि आता राज्य पातळीपर्यंतच्या त्याच्या प्रवासामुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. पांग्रड आणि भांडुप परिसरात सध्या विराजच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. राज्य अजिंक्यपदाच्या या व्यासपीठावर विराज कसा चमकतो याकडे खेळप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ