spot_img

Bewaras Vikram Gokhale Upcoming Cinema : ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांसमोर; हृदयाला भिडणारी, सामाजिक वास्तवावर आधारित सिनेमा

spot_img

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने अमिट छाप सोडणारे विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट ‘बेवारस’ आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. गुढी पाडव्याच्या शुभदिनी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित आणि शिव आर्यन फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात एक भावनिक आणि सामाजिक आशय असलेली कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय राणे यांनी केले असून पटकथा आणि संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. संगीत आणि इतर तांत्रिक बाबींसाठीही अनुभवी टीम कार्यरत आहे. या चित्रपटात तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, रुतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजीत मारा आणि आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पोस्टरमध्ये विक्रम गोखले एका लहान मुलाला मिठी मारताना दिसतात, आणि त्यातूनच चित्रपटाच्या भावनिक अंगाची झलक मिळते. कथानक एका तत्त्वनिष्ठ अनाथालय चालवणाऱ्या आबाजीभोवती फिरते. एक अनाथ मुलगा स्वतःच्या हक्कांसाठी आपल्या आई-वडिलांविरुद्ध न्यायालयात का उभा राहतो, यामागची वेदनादायी आणि प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात उलगडली आहे.भावना, संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणार, यात शंका नाही. प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ