spot_img

Best Selling Car : SUV च्या लाटेतही ‘डिझायर’चाच डंका; २०२६ मध्ये ठरली भारतातील नंबर १ कार!

spot_img

वर्षभरात २ लाखांहून अधिक विक्री; मध्यमवर्गीयांच्या विश्वासाने मारुतीची सेडान पुन्हा अव्वल स्थानी

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सर्वत्र एसयूव्ही (SUV) गाड्यांचे वारे वाहत असताना, मारुती सुझुकीच्या ‘डिझायर’ (Maruti Dzire) या कॉम्पॅक्ट सेडानने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील विक्रीची आकडेवारी समोर आली असून, ‘डिझायर’ने सर्व मोठ्या गाड्यांना मागे टाकत देशातील ‘सर्वात जास्त विकली जाणारी कार’ हा किताब पटकावला आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी २.०७ लाखांहून अधिक डिझायर घरी नेल्या आहेत, तर संपूर्ण वर्षाचा आकडा २.१४ लाखांच्या पार गेला आहे.

२००८ मध्ये जेव्हा ही गाडी पहिल्यांदा रस्त्यावर आली, तेव्हापासूनच आपल्या प्रशस्त डिझाइन आणि उत्तम मायलेजमुळे तिने भारतीय मनावर राज्य केले आहे. एकेकाळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये येणारी ही गाडी आता फक्त पेट्रोल आणि सीएनजी (CNG) पर्यायांत उपलब्ध आहे. डिझेल इंजिन बंद होऊनही डिझायरच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाही. उलट, वाढत्या इंधन दरांमुळे सीएनजी व्हेरियंटला टॅक्सी व्यवसायासोबतच मध्यमवर्गीय कुटुंबांकडूनही प्रचंड मागणी मिळत आहे. ६.५७ लाख ते ९.३९ लाख रुपयांपर्यंतची किंमत ही या गाडीचे सर्वात मोठे आकर्षण ठरली आहे.

ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मारुती सुझुकीचे देशभर पसरलेले सर्व्हिस नेटवर्क, गाडीचा अत्यल्प देखभाल खर्च आणि जबरदस्त रिसेल व्हॅल्यू (पुनर्विक्री मूल्य) यामुळे ‘डिझायर’ आजही स्पर्धेत टिकून आहे. नवीन पिढीतील डिझायरमध्ये देण्यात आलेले आधुनिक फीचर्स आणि सुधारित सुरक्षा यंत्रणांमुळे तरुण पिढीलाही ही गाडी भुरळ घालत आहे. कितीही नवनवीन एसयूव्ही मार्केटमध्ये आल्या, तरी किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवासासाठी आजही ‘डिझायर’ हाच भारतीयांचा पहिला आणि खात्रीशीर पर्याय असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ