spot_img

Bergman competition : जागतिक दर्जाच्या बर्गमन स्पर्धेत डॉ.पोपट चौधरी यांना मिळाला ‘बर्गमॅन’ किताब

spot_img

श्री क्षेत्र ओझर येथे झाली जागतिक बर्गमन स्पर्धा

श्री क्षेत्र ओझर येथे रविवारी (दि. १२) जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्राला नवी चालना देणारी बर्गमॅन स्पर्धा (Bergman competition) श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व डेक्कन स्पोर्टस् क्लब कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे यांनी दिली. सदर स्पर्धेसाठी अमेरीका, जपान, तैवान, आस्ट्रेलिया तसेच भारतामधील दिल्ली, झारखंड, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू असे विविध देश तसेच राज्यातून पाचशे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

१२ आक्टोंबर रोजी पहाटे ६.३० वाजता जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे(MLA Sharad Sonawane)तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त संतोष कवडे, समिर मांडे, विनायक मांडे, प्रकाश मांडे, मंगेश पोखरकर, विलास कवडे तसेच डेक्कन स्पोर्टसचे आयोजक व हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला.

देश विदेशातून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी दोन किलोमीटर जलतरण,९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावणे यांचा अंतर्भाव होता. या तीनही गोष्टी साडेआठ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास बर्गमन हा किताब देऊन गौरवले जाते. तसेच स्पर्धेदरम्यान ऑलिंपिक डिस्टन्स बर्गमन या क्रीडा प्रकारात डॉ.चौधरी यांनी दहा किलोमीटर रनिंग,४० किलोमीटर सायकलिंग आणि दीड किलोमीटर जलतरण या तीनही बाबी नियोजित वेळेच्या अगोदर म्हणजे चार तासांमध्ये पूर्ण केल्या.ऑलिंपिक डिस्टन्स बर्गमन हा किताब देऊन त्यांना गौरवले गेले. त्यांचे समवेत फार्मासिस्ट निवृत्ती घोलप, विनायक मुंढे यांनाही या किताबाने गौरवले गेले.यापूर्वी डॉक्टर चौधरी यांनी जवळपास २० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहेत.या कामगिरीबद्दल तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शरद चौधरी, ग्रामविकास मंडळ ओतूरचे सेक्रेटरी प्रदीप गाढवे, पंकज घोलप , सोपान चौधरी, जयसिंग डुंबरे, गणेश डुंबरे,सरपंच रेखा हांडे ,ओझर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उंब्रज ग्रामस्थ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थानला २३ लाखांचा धनादेशही सुपूर्द केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ