spot_img

Bengaluru Accident : बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं कांड, पोलिसांनी केली अटक

spot_img

मनोरंज विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय घडलं पाहूयात. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू (Bangalore) मध्ये ही घटना घडली. प्रसिद्ध अभिनेता मयूर पटेल (Mayur Patel) विरुद्ध पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे आणि बेपर्वा गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड एअरपोर्ट रोडवर झालेल्या एका भीषण अपघातानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ओल्ड एअरपोर्ट रोडवर मयूर पटेल त्याची फॉर्च्युनर कार अत्यंत वेगाने चालवत होता. काही क्षणातच त्याचे नियंत्रण सुटलं आणि त्याची कार पार्क केलेल्या कारला धडकली. धडक इतकी जोरदार होती की मागच्या इतर गाड्यांनाही धक्का बसला. जवळील इतर वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एकूण चार वाहनांचे मोठे नुकसान झालं. या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी लगेचच अभिनेता मयूर पटेलला ताब्यात घेतले. त्याची ब्रेथअ‍ॅलायझर चाचणी घेण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. अभिनेता दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अभिनेत्याची आलिशान फॉर्च्युनर कार जप्त केली. तसंच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ