spot_img

Beed News : धनंजय मुंडेंचे समर्थक गोविंद फड यांच्या पोस्टमुळे बीडमध्ये खळबळ

spot_img

जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना थेट इशारा? पोस्ट व्हायरल; समर्थक-विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

बीड जिल्ह्यात विविध घडामोडींमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे आधीच चर्चेत असलेले आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अशातच मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गोविंद फड यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

गोविंद फड यांनी आपल्या पोस्टमध्ये, “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास,” असा इशाराच दिल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांनी जरांगे पाटील आणि सुरेश धस यांची नावे घेऊन थेट भाष्य केले. ही पोस्ट इंग्रजी भाषेत करण्यात आली असून, त्यांनी असा संदेश का दिला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

फड हे परळी बाजार समितीचे माजी सभापती असून, ते मुंडे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या विधानाला राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व दिले जात आहे. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी याला उघड धमकीचा सूर असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी अशा भाषेचा निषेध व्यक्त केला आहे.

बीडमध्ये आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यांमुळे आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवर टीका होत असताना फड यांच्या वक्तव्याने वातावरण आणखी ताणले गेले आहे. दरम्यान, मुंडे समर्थकांकडून फड यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला जात असला, तरी विरोधकांकडून तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत. या प्रकरणामुळे पुढील काळात बीडच्या राजकारणात आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ