spot_img

Beauty Tips : लग्नापूर्वी, या ब्युटी टिपस वापरून तुम्ही देखील मिळवू शकता नॅचरल ग्लो…

spot_img

लग्न म्हणल्यावर सर्वात जास्ती तयारी हि वधू आणि वराला करावी लागते. कपड्यापासून ते लुकपर्यंत सर्व काही पिक्चर परफेक्ट असावं असं प्रत्येक वधुवराला वाटत. मुलींना नेहमी एक चिंता असते लग्नाच्या दिवशी मेकअप टिकणं हे फार जोखिमेच काम वाटतं. त्यामुळे नवरीसाठी आजकाल पार्लरमध्ये विविध प्रकारचे फेशियल आले आहेत. पण हे फेशिअल पॅक (Beauty packs) अत्यंत महागडे असतात. कधी कधी सामान्य मुलींना ते खरेदी करणे परवडत नाही आणि जेव्हा आपण हे लो बजेट असणारे प्रॉडक्ट वापरतो तेव्हा बऱ्याचदा त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी बऱ्याच जणी नैसर्गिक किंवा घरगुती गोष्टींचा वापर वाढवतात. जर तुम्हाला अगदी नैसर्गिक घरगुती उपाय करून त्वचा चमकदार बनवायची असेल तर काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात.

घरात सहज उपलब्ध असलेले हळद, बेसन, चंदन, दूध, बदाम यांसारख्या घटकांपासून एक उटणं तयार करा आणि ते त्वचेवर लावा. हे त्वचेची खोलवर स्वच्छता करत आणि त्वचा चमकदार बनवत. लग्नाच्या १ महिन्याआधी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवतो. हळद हि शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हळदीचे दाहक-विरोधी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचा उजळण्यासाठी मदत करतात. त्याबरोबरच चंदनाच्या पावडरमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हि येते.

तुमच्या त्वचेला जर आतून पोषण द्यायचे असेल तर मूग डाळीचे पीठ आणि बेसनाचे मिश्रण अति उत्तम. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते, ज्यामुळे त्वचा उजळ होते. मूग डाळीचं पीठ आणि बेसनाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यात थोडं कच्चं दूध घातल्यास आणखी फायदा होऊ शकतो. त्याबरोबरच बदामाचा हि अशा पॅकमध्ये वापर करा. बदामामुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळते ज्यामुळे त्वचा ताजी दिसते. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील मुरमे कमी करण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. काही तास बदाम दुधात भिजवा नंतर बदामाची सालं काढून मिश्रणाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. असे बरेच काही छोटे छोटे घरगुती उपाय आपण ग्लो आणण्यासाठी करू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ