spot_img

BCCI Naman Awards : बीसीसीआयचा भोंगळ कारभार; रोहित शर्माचा अपमान की निष्काळजीपणा?

spot_img

पुरस्कार सोहळ्यात दोन मोठ्या तांत्रिक चुका; रोहितच्या जागी गिलला ‘चॅम्पियन कॅप्टन’ म्हटल्याने वाद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकताच दिल्लीत आपला वार्षिक ‘नमन’ पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. मागील वर्षात आयसीसीच्या पाच महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मात्र, दिमाखदार सोहळ्यात आयोजकांकडून झालेल्या दोन गंभीर चुकांमुळे बीसीसीआयवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. स्टार स्पोर्ट्सवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच, या तांत्रिक चुका लाखो प्रेक्षकांच्या नजरेस पडल्या.

पहिली मोठी चूक अंडर-१९ महिला विश्वचषक विजेत्या संघाच्या सन्मानावेळी घडली. जेव्हा या युवा खेळाडूंना स्टेजवर बोलावण्यात आले, तेव्हा मागे असलेल्या स्क्रीनवर या टीमऐवजी हरमनप्रीत कौरच्या वरिष्ठ महिला संघाचा फोटो झळकत होता. आश्चर्याची बाब म्हणजे, ही चूक लक्षात आल्यानंतरही बराच वेळ तो फोटो बदलण्यात आला नाही. दुसरी आणि सर्वात मोठी चूक चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा उल्लेख करताना झाली. या सोहळ्याला रोहित शर्मा अनुपस्थित असल्याने त्याच्या जागी शुबमन गिल मंचावर होता. मात्र, स्क्रीनवर गिलचा उल्लेख ‘चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा कर्णधार’ असा करण्यात आला.

या प्रकारामुळे रोहित शर्माचे चाहते प्रचंड संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु चाहत्यांचा वाढता रोष पाहून आणि चुका निदर्शनास आल्यावर तो व्हिडिओ तातडीने हटवण्यात आला. खेळाडूंच्या गौरवार्थ आयोजित केलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात अशा प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ