spot_img

BCCI : भारतीय क्रिकेटचा ‘नमन’ सोहळा, विश्वविजेत्या भारतीय संघांवर दिल्लीत होणार कौतुकाचा वर्षाव

spot_img

शुभमन गिल पुन्हा एकदा ‘किंग’, तर स्मृती मानधनाचा ऐतिहासिक पंच!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२६ सालासाठीच्या मानाच्या ‘नमन पुरस्कारांची’ घोषणा केली असून, रविवारी १५ मार्च रोजी नवी दिल्लीत क्रिकेट ताऱ्यांचा मेळा भरणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे तो म्हणजे भारताचा अष्टपैलू कर्णधार शुभमन गिल. गिलला यंदाचा प्रतिष्ठित ‘पॉली उम्रीगर क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा बहुमान पटकावून त्याने सचिन तेंडुलकर आणि आर. अश्विन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दुसरीकडे, महिला क्रिकेटची स्टार स्मृती मानधना हिने आपल्या शिरपेचात मानाचा पाचवा तुरा रोवला असून, तिला पाचव्यांदा ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर’ म्हणून गौरवण्यात येणार आहे.

या सोहळ्यात केवळ वैयक्तिक कामगिरीच नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गजांचाही सन्मान होणार आहे. भारताचे माजी खेळाडू आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह ‘द वॉल’ राहुल द्रविड यांना ‘कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमधील क्रांतीची शिल्पकार मिताली राज हिला देखील याच श्रेणीत जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता, त्या ऐतिहासिक विजयाची आठवण या निमित्ताने ताजी होणार आहे.

केवळ ज्येष्ठ खेळाडूच नव्हे, तर बीसीसीआयने आगामी पिढीतील टॅलेंटचीही दखल घेतली आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रे याला आणि विदर्भाच्या हर्ष दुबे याला ‘लाला अमरनाथ’ अष्टपैलू पुरस्काराने गौरवण्यात येईल. यासोबतच, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० विश्वविजेत्या संघासह, अलीकडच्या काळात आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या पाचही भारतीय संघांचा (पुरुष, महिला आणि १९ वर्षांखालील) विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे दर्शन घडवणारा हा सोहळा क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ