Baramati Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीत राजकीय हालचाली वेगात; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

spot_img

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघत आहे. विविध पक्षांकडून बैठका, चर्चासत्रे आणि आघाड्यांच्या हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री नेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत पोटनिवडणुकीसाठी संभाव्य पाठिंब्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, बारामतीची निवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून बारामतीसाठी सहा तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय वंचित आघाडीचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ