spot_img

Bank Strike : बँकांशी संबंधित काम आधीच घ्या उरकून, बँक युनियन्सची घोषणा

spot_img

संपूर्ण देशातील बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचारी युनियनने 27 जानेवारीला देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) नेतृत्वाखाली बँक कर्मचारी युनियनची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मुख्य मागणी आहे. संप झालाच तर सलग तीन दिवस बँकेच कामकाज प्रभावति होईल. 25 आणि 26 जानेवारीला आधीच सुट्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी बँकेशी संबंधित कामं आधीच उरकून घ्यावीत.

पाच दिवसांची वर्किंग सिस्टिम लागू करण्यावर आधीच सहमती झालीय असं बँक कर्मचारी युनियनचं म्हणणं आहे. मार्च 2024 मध्ये वेतन कराराच्यावेळी हा निर्णय झालेला. मात्र, तरीही सरकार आणि व्यवस्थापनाकडून या बद्दल कुठलही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. आमची मागणी योग्य आहे, असं युनियन्सच म्हणणं आहे. त्यासाठी आता संपाचा मार्ग निवडण्यात आलाय. 27 जानेवारीला संप झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच कामकाज ठप्प होऊ शकतं. कॅश डिपॉझिट, विथड्रॉ, चेक क्लियरेन्स आणि शाखांशी संबंधित सेवा प्रभावित होऊ शकतात. सलग तीन दिवस बँका बंद राहिल्याने सर्वसामान्यांना अडचणी येऊ शकतात. म्हणून ग्राहकांना बँकांशी संबंधित काम आधीच करुन घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ