spot_img

Band Baja Barat : रणवीर–अनुष्काची हिट जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘बँड बाजा बारात’ची री-रिलीज तारीख जाहीर

spot_img

16 जानेवारीपासून PVR-INOX मध्ये पुन्हा रंगणार रोमँटिक कॉमेडीचा जल्लोष

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असतानाच, बॉलिवूड चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांची लोकप्रिय जोडी असलेला ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या री-रिलीजमुळे प्रेक्षकांना रणवीर–अनुष्काची धमाल केमिस्ट्री पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

पीव्हीआर सिनेमाजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘बँड बाजा बारात’च्या री-रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने तो पुन्हा थिएटरमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हलकीफुलकी कथा, धमाल संवाद आणि लक्षात राहणारे संगीत हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.

‘बँड बाजा बारात’ 16 जानेवारीपासून PVR आणि INOX सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, अनेकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

2010 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट रणवीर सिंहच्या करिअरची सुरुवात ठरला होता. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरने बिट्टू शर्मा, तर अनुष्काने श्रुती कक्कड ही भूमिका साकारली होती. लग्न समारंभाच्या व्यवसायातून सुरू झालेली त्यांची मैत्री, नंतर प्रेमात बदलते आणि त्यातून अनेक मनोरंजक प्रसंग उलगडतात.

दरम्यान, रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असून, त्याच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. आता ‘बँड बाजा बारात’च्या री-रिलीजमुळे रणवीरच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ