Badshah Marriage News : गायक बादशाहने गुपचूप केलं दुसरं लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

spot_img

सिनेसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत असून प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह याच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत असून त्याने दुसऱ्यांदा विवाह केल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती, मात्र कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. आता पूनम रिखी नावाच्या महिलेने काही खास फोटो शेअर केल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. या फोटोंमध्ये बादशाह आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची दुसरी पत्नी पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखी असल्याचे सांगितले जात आहे. हा विवाह अतिशय साध्या पद्धतीने पार पडला असून यात फक्त जवळचे लोक सहभागी झाले होते. व्हायरल फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हार घालताना आणि लग्नाचे विधी करताना दिसत आहेत.

यापूर्वी बादशाहने 2012 मध्ये जास्मिन मसिह हिच्याशी लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही आणि 2020 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता सहा वर्षांनंतर त्याने पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, बादशाहने अद्याप या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ