Bacchu Kadu : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; बच्चू कडूंचा जुना व्हिडीओ व्हायरल

spot_img

नाशिकमधील अशोक खरात या स्वयंघोषित बाबाच्या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचे समोर येत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचाही अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खरात बच्चू कडूंना भविष्यात मंत्रिपद मिळेल असे सांगताना दिसतो. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू त्याच्या पाया पडताना दिसतात, ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच रंग चढला आहे.

हा व्हिडिओ सुमारे दोन वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात झालेल्या बंडात बच्चू कडू हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र, त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते, ज्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.आता हा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आल्याने राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ