spot_img

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठण करणारा अब्दुल कोण?

spot_img

एका व्यक्तीने राम मंदिर (Ram Mandir) परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. यानंतर त्या व्यक्तीने एका विशिष्ट समुदायाविरुद्ध घोषणाबाजीही केली. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. ही घटना मंदिराच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर संस्था, पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाची चौकशी सुरू केली. या चौकशीत या व्यक्तीचे नाव अब्दुल असल्याचे समोर आले आहे. तो कोण आहे ते जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अब्दुल अहद शेख असे आहे. अब्दुल जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वय 55 वर्षांच्या आसपास आहे. त्याचीचौकशी केली असता असे आढळून आले की, त्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सीता रसोईजवळ नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला त्यापासून रोखण्यात आले. अयोध्येतील या घटनेनंतर अयोध्या पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी काश्मीरमध्येही तपास सुरू केला आहे. चौकशीसाठी सुरक्षा कर्मचारी या व्यक्तीच्या शोपियान येथील घरी पोहोचले आणि चौकशी केली. यावेळी त्याचा मुलगा इम्रान शेखने सांगितले की त्याचे वडील सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घर सोडून गेले होते. मात्र ते अयोध्येत का गेले किंवा तिथे काय घडले याबद्दल कुटुंबाला माहिती नाही. तसेच कुटुंबाने असे म्हटले आहे की अब्दुल अहद शेख मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. दरम्यान, आता या घटनेनंतर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ