छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)बायजीपुरात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना चार जणांकडून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इम्तियाज जलील यांच्या थारवर चारजण मारहाण करण्यासाठी तुटून पडले. यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांच्यासमोर हल्ला झाला. खूनी लोकांची हिम्मत इतकी वाढली आहे. रीतसर परवानगी घेऊन रॅली काढण्यात आली. पीआय आणि त्यांची संपूर्ण पोलीस फोर्स तिथे होते. आता ते काय कारवाई करणार हेच आम्ही पाहतोय.अशाप्रकारे गुंडगिरी करून निवडणूक लढता येत नाही. ही गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही, असं इम्तियाज जलील म्हणाले.
कलीम कुरेशी हा प्रभाग 9 मधून वंचितचा उमेदवार आहे आणि 14 मधून काँग्रेसचा उमेदवार आहे. कलीम कुरेशींनी इम्तियाज जलील यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला आहे. तर हे सगळं एमआयएमनेच घडवून आणल्याचा दावा कलमी कुरेशींनी केला आहे.




