spot_img

Asim Sarode On Suresh Dhas : आ.सुरेश धसांकडून जीवाला धोका असल्याचा सरोदेंचा गंभीर आरोप

spot_img

आमदार सुरेश धस सत्ताधारी असल्यामुळे सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोप देखील असी सरोदे यांनी केला आहे.

भाजप आमदार सुरेश (Suresh Dhas) धसांकडून माझ्याही जीवाला धोका असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला तसा हल्ला माझ्यावरही होऊ शकतो असा धक्कादायक आरोप कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर केल्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. राम खाडे यांच्याशी माझं 15 दिवसांपूर्वी बोलण झालं होतं तेव्हा त्यांनी मला जपून काम करा असं सांगितलं होतं. तर राम खाडे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात यावी अशी मागणी देखील असीम सरोदे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना असीम सरोदे (Asim Sarode) म्हणाले की, बीड जिल्ह्यातील काही हजारो एक्कर जमीन सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन आणि स्वत:च्या पदाचा वापर करुन देवस्थानांच्या अनेक जमीनी खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वळून घेतत्या. त्याच्यावर प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकले सुद्धा असा एक खूप मोठा आर्थिक घोटाला झाला असं राम खाडे यांचे म्हणणे होते असं असीम सरोदे म्हणाले. तसेच 1000 कोटींची जमीन हडपल्याचे सुरेश धसांचे प्रकरण राम खाडे यांनी काढल्याने सुरेश धस यांच्या लोकांकडून राम खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचा दावा देखील माध्यमांशी बोलताना असीम सरोदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे राम खाडे यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरु असून त्यांची तब्येत नाजूक असल्याची माहिती देखील असीम सरोदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ