भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्याविरुद्धचे आरोप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर आणखी एका लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गरोदर असताना खरातने विधी करण्याच्या बहाण्याने तिच्या नवऱ्याला बाहेर थांबायला सांगितले आणि तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, लोकांना घाबरवण्यासाठी तो नकली सापाचे आणि वाघाचे कातडे दाखवून अंधश्रद्धा पसरवत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




