नाशिकमध्ये स्वतःला चमत्कारिक शक्ती असल्याचे भासवणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दैवी आशीर्वादाच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५८ व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये तो महिलांशी अश्लील वर्तन करताना दिसत असल्याचे समोर येत आहे.
सुरुवातीला नाशिक पोलिस क्लबमध्ये त्याची चौकशी सुरू होती, मात्र आता विशेष तपास पथकाने (SIT) त्याला अज्ञात ठिकाणी हलवून अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे. या तपासात त्याच्या फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांची तसेच मंदिराशी संबंधित पुजाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
नाशिकची स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटी मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः या चौकशीत लक्ष घालत असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




