spot_img

Ashish Vidyarthi Accident : आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरूआ यांचा गुवाहाटीत भीषण अपघात !

spot_img

प्रसिद्ध बॉलिवूड तसेच साऊथ अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) आणि त्यांची पत्नी रूपाली बरूआ यांचा भीषण अपघात झाला. हा अपघात गुवाहाटी (Guwahati) येथे घडला असल्याची माहिती आहे. रात्री 12 वाजेच्या सुमारास झू रोडवरील अॅड्रेस हॉटेलसमोर हा अपघात घडला. आशिष विद्यार्थी आपल्या पत्नीसह हॉटेल अॅड्रेसमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर हे कपल एकत्र हॉटेलमधून बाहेर पडले. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही रस्ता पार करत होते. रस्ता ओलांडत असताना भरधान मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की, दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजेच्या सुमारास, चांदमरी परिसरातून येणाऱ्या एका भरधाव मोटारसायकलने कपलला रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, अभिनेता आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी तातडीने धाव घेतली. तसेच पोलिसांना या अपघाताच्या घटनेबाबत माहिती दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी ताबडतोब गुवाहाटी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताबाबत गीतानगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास सुरू केला.

हा अपघात नेमका घडला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघातानंतर आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरूआ यांनाही उपचारासाठी नेण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला? अपघात घडण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दुचाकीस्वाराची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ