Asha Bhosle Passes Away: आशा भोसले यांचे निधन; कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? वाचा सविस्तर…

spot_img

भारतीय संगीतसृष्टीचा एक सुवर्णकाळ आज संपुष्टात आला आहे. आपल्या जादूई आवाजाने गेल्या सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चिरतरूण ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्राणज्योत आज, १२ एप्रिल रोजी मालवली. काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअर) त्यांची प्राणज्योत विझली. आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी या दुःखद वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘पिया तू अब तो आजा’ सारखी उडत्या चालीची गाणी असोत किंवा ‘मागे उभा मंगेश’ सारखी भावगीते, प्रत्येक प्रकाराला आपल्या खास शैलीने जिवंत केले. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

आशाताईंचे पार्थिव उद्या (सोमवार) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. “एका युगाचा अंत झाला असून आशाताईंचे आयुष्य म्हणजे दुःखाला कवटाळून जगाला सुख देणारा एक प्रवास होता,” अशा शब्दांत शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता, त्यामुळेच त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश आज शोकाकुल झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ