spot_img

Arshdeep Singh : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये राडा; अर्शदीप सिंगने तिलक वर्माची उडवली खिल्ली

spot_img

टीम इंडियाच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये बुधवारी रात्री मस्करीची चांगलीच कुस्करी झाली आहे. सामन्यानंतर अर्शदीपवर तिलक वर्मा चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनीही तिलक वर्माची बाजू घेऊन अर्शदीपला ट्रोल करायला सुरुवात केली. टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आपल्या फिरकी आणि विनोदी स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर त्याचे मजेशीर व्हिडीओ चर्चेचा विषय असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अर्शदीप वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हिडिओमध्ये अर्शदीप आपल्याच संघातील सहकारी खेळाडू तिलक वर्मा (Tilak Verma) याच्या दिसण्यावरून त्याची मस्करी करताना दिसत आहे. अर्शदीपची ही मस्करी स्वतः टिळक वर्मा आणि चाहत्यांनाही अजिबात आवडलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग म्हणतो, “तिलक… याला आपण एवढं… नाही, तिलकला पाहू शकत नाही, तो खूप वाईट दिसतो.” अर्शदीपचं हे वाक्य ऐकताच तिलक वर्माचा पारा चढला. त्याने अर्शदीपला आपली परवानगी न घेता व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई केली. तिलकच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, मात्र अर्शदीपने तरीही व्हिडिओ बनवणं आणि मस्करी करणं थांबवलं नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ